संपादकीय
श्री आदियोग साधकांचे योगदर्शन परिषदेत १० संशोधनांचे उल्लेखनीय सादरीकरण
नुकत्याच नाशिक येथे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात पार पडलेल्या योगदर्शन २०२४ राष्ट्रीय परिषदेत श्री आदियोग आंतरराष्ट्रीय शिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांनी , शिक्षकांनी व साधकांनी योगदर्शन परिषदेत योगाशास्त्रातील विविध विषयावरील १० संशोधन लेखांचे यशस्वी सादरीकरण केले . संपूर्ण देशातून जवळपास २०० पेक्षा अधिक साधकांनी यात सहभाग नोंदविला होता. त्यातील श्री आदियोग संस्थेच्या साधिका दर्शना राजपूत यांनी परदेशातून सहभाग नोंदविला.त्या भारत सरकारच्या सांस्कृतिक विभागातर्फे परदेशात योगशास्त्राचा प्रसार हेतूने “योग प्रतिनिधी -YOGA AMBASSADOR म्हणून कार्यरत आहेत. योगाचे मानसिक व्याधी निवारणासाठी परिणाम ,योग ध्यानपद्धतींचा कुंडलिनी चक्रांवर होणारे परिणाम ,योगनिद्रेचे जेष्ठ साधकांवर होणारे परिणाम , चित्रकला माध्यमांचा शालेय विद्यार्थ्यांच्या चंचलता ,एकाग्रता घटकांवर होणारे परिणाम अशा विषयांचा यात अंतर्भाव होता. प्रत्यक्ष समाजातील घटन्कांचा अभ्यासात समावेश करून