योगदर्शन-२०२४-आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या पार्श्वभूमीवर यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाने योगदर्शन-२०२४ परिषदेचे आयोजन केले आहे.दिनांक २३-२४ ऑगस्ट रोजी हे आयोजन आहे.या परिषदेसाठी योगशास्त्र शाखेतील विविध विषयांमध्ये कार्यरत असणारे साधक,अभ्यासक,तज्ञ ,संशोधक यांना निमंत्रित केले गेले आहे.समाजातील सर्व घटकांसाठी हि दिशादर्शक ठरेल. असे परिषदेचे संयोजक डॉ जयदीप निकम (संचालक ,आरोग्य आणि स्वास्थ्य विभाग ( YCMOU ) यांनी माहिती देताना सांगितले.या निमित्ताने समाजात योगाबद्दल ज्ञानार्जन घेण्यासाठी प्रेरणा वाढीस लागेल. योग शाखेविषयी विविध अंगांचा सखोल अभ्यास वाढीस लागून स्पष्टता वाढेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला .साधकांना योगाच्या मूळ ग्रंथांचा अभ्यास करण्याची वृत्ती वाढीस लागेल.सर्व सामान्य योग पद्धती आणि मूळ शास्त्र यातील तुलनात्मक अध्ययनास वाव मिळेल असेही ते म्हणाले .
या परिषदेत मराठी ,इंग्रजी व हिंदी भाषेतील संशोधन लेख ,शास्त्रीय माहितीवर आधारित सादरीकरण आणि योग प्रात्याक्षिके यांचा समावेश असेल. परिषदेत योग शिक्षक व तज्ञ ,संस्कृत व तत्वज्ञान विषयातील प्राध्यापक , नवोदित योग साधक आणि विद्यार्थी यांना संधी मिळेल असेही डॉ निकम यांनी नमूद केले.
