संस्कृत विद्यापीठाचे संचालक डॉ गोविंद पांडे यांनी दि ११ ऑगस्ट रोजी श्री रामकृष्ण सेवा संघाच्या तळवडे येथील आरोग्य केंद्रास भेट दिली. या प्रसंगी आरोग्य केंद्राचे मार्गदर्शक व “जागृत भारत जागृत नाशिक” चळवळीचे प्रणेते स्वामी श्रीकठानंद यांनी कार्याची सविस्तर माहिती दिली.तुपादेवी फाटा येथे स्थित या आरोग्य केंद्रावर त्र्यम्बकेश्वर तालुक्यातील दुर्गम व ग्रामीण भागातील रुग्णांना नि:शुल्क उपचार व आरोग्य सेवा प्रदान केली जाते. या सेवेतून ग्रामीण व वंचित घटकांना तज्ञ वैद्यकीय अधिकारी यांचे समुपदेशन व सल्ला मिळतो .डॉ पांडे यांनी या सेवा कार्याबद्दल प्रशंसोद्गार काढले व शुभेच्छा व्यक्त केल्या.