8 ऑगस्ट 2024 रोजी केंद्रीय संस्कृत विश्वविद्यालयाच्या नाशिक परिसरामध्ये दुपारी तीन वाजता राष्ट्रीय सद्भावना दिवस अत्यंत उत्साहाने साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात मुख्यातिथी म्हणून श्री आदियोग इंटरनॅशनल संस्थेचे संस्थापक डॉ. संजय गवळी उपस्थित होते. त्यांनी त्यांच्या उद्बोधनात आखाती राष्ट्रातील त्यांचे अनुभव सांगितले व त्या अनुभवांना सद्भावनेशी जोडले. या कार्यक्रमात केंद्रीय संस्कृत विश्वविद्यालयाच्या नाशिक परिसराचे संचालक प्रा.
श्री गोविंद पांडेय यांनी अध्यक्ष भाषण केले. व्याकरण विभागाचे समन्वयक श्री इंद्रकुमार मीना यांनी प्रास्ताविक व स्वागत भाषण केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन साहित्य विभागातील प्रा. डॉ. सोमेश बहुगुणा यांनी केले तसेच धन्यवाद कथन व्याकरण विभागातील प्रा. डॉ. राहुल शर्मा यांनी केले. याप्रसंगी नाशिक परिसरातील प्रा. रामचंद्र जोशी, प्रा. कुमार भट, प्रा. शंकर आंधळे इत्यादी प्राध्यापक तसेच परिसरातील सर्व विद्यार्थी उपस्थित होते.