नागपूरच्या योगाभ्यासी मंडळाचे अनुशासन व साधनेचा दृष्टीकोन या शास्त्रातील प्रगतीसाठी मला अतिशय समृद्ध करणारा ठरला.त्यामुळे अनुशासन व साधना हि मनुष्यास कठीण प्रसंगी तरुन जाण्याची शक्ती देते व तिला पर्याय नाही असे प्रतिपादन प्रा.शशिकला वंजारी (कुलपति, राष्ट्रीय शैक्षिक योजना व प्रशासन संस्था.दिल्ली,विद्यापीठ नियोजन मंडळ सदस्य) यांनी परिषदेस असलेल्या उपस्थितांना मार्गदर्शन करताना केले.
योग अभ्यास करताना लहानातील लहान कृती देखील महत्वाची समजून करणे हे आपली अभ्यासाचाच भाग असतो. असेही त्या म्हणाल्या.नवीन शिक्षण प्रणालीमध्ये अंमलबजावणी करीत असताना शिक्षक,पालक,विद्यार्थी व प्रक्रिया यांचे संतुलन साधण्यासाठी विद्यापीठ यंत्रणेस मोठी जबाबबदारी चे आव्हान समोर आहे .पालकांचे समुपदेशन तितकेच महत्वाचे ठरणार आहे असे मत त्यांनी नोंदविले.