नुकत्याच यशस्वीरीत्या पार पडलेल्या योगदर्शन-२०२४ परिषदेचे यश व गाठलेली उंची हे त्यात झालेल्या बौद्धिक,वैचारिक मंथनाची फलश्रुती आहे असे मत प्रा.संजीव सोनवणे, कुलगुरू यांनी समारोप प्रसंगी व्यक्त केले . जवळपास १०६ शोध निबंध या परिषदेच्या निमित्ताने सादर झाले. संपूर्ण देशातून तसेच परदेशातून देखील काही साधकांनी त्यांचे सादरीकरण केले. परिषदेचे यश हे जितके त्यातील आयोजनाच्या घटकांवर अवलंबून असते त्याहीपेक्षा तिचे मूल्य बौद्धिक स्तरावरील घडलेल्या संवादावर ठरते असेही ते म्हणाले .आयोजन समितीचे अभिनंदन करताना मुख्य नेतृत्वाची ढवळाढवळ तितकी आवश्यक नसते .सहकार्यांवरील विश्वास व त्या समित्या यांचेवरील जबाबबदारी पार पाडण्याचे स्वातंत्र्य हेच अशा यशाचे गमक होय असे ते म्हणाले.