योगशास्त्रात प्रगतीसाठी अनुशासन व साधनेशिवाय पर्याय नाही- प्रा.शशिकला वंजारी ,कुलपति, राष्ट्रीय शैक्षिक योजना व प्रशासन संस्था.दिल्ली
नागपूरच्या योगाभ्यासी मंडळाचे अनुशासन व साधनेचा दृष्टीकोन या शास्त्रातील प्रगतीसाठी मला अतिशय समृद्ध करणारा ठरला.त्यामुळे अनुशासन व साधना हि मनुष्यास कठीण प्रसंगी तरुन जाण्याची शक्ती देते व तिला पर्याय नाही असे प्रतिपादन प्रा.शशिकला वंजारी (कुलपति, राष्ट्रीय शैक्षिक योजना व प्रशासन संस्था.दिल्ली,विद्यापीठ नियोजन मंडळ सदस्य) यांनी परिषदेस असलेल्या उपस्थितांना मार्गदर्शन करताना केले. योग अभ्यास करताना लहानातील…