नुकत्याच नाशिक येथे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात पार पडलेल्या योगदर्शन २०२४ राष्ट्रीय परिषदेत श्री आदियोग आंतरराष्ट्रीय शिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांनी , शिक्षकांनी व साधकांनी योगदर्शन परिषदेत योगाशास्त्रातील विविध विषयावरील १० संशोधन लेखांचे यशस्वी सादरीकरण केले . संपूर्ण देशातून जवळपास २०० पेक्षा अधिक साधकांनी यात सहभाग नोंदविला होता. त्यातील श्री आदियोग संस्थेच्या साधिका दर्शना राजपूत यांनी परदेशातून सहभाग नोंदविला.त्या भारत सरकारच्या सांस्कृतिक विभागातर्फे परदेशात योगशास्त्राचा प्रसार हेतूने “योग प्रतिनिधी -YOGA AMBASSADOR म्हणून कार्यरत आहेत.
योगाचे मानसिक व्याधी निवारणासाठी परिणाम ,योग ध्यानपद्धतींचा कुंडलिनी चक्रांवर होणारे परिणाम ,योगनिद्रेचे जेष्ठ साधकांवर होणारे परिणाम , चित्रकला माध्यमांचा शालेय विद्यार्थ्यांच्या चंचलता ,एकाग्रता घटकांवर होणारे परिणाम अशा विषयांचा यात अंतर्भाव होता. प्रत्यक्ष समाजातील घटन्कांचा अभ्यासात समावेश करून प्रयोगात्मक अभ्यास येथे मांडण्यात आला. सांख्यिकी तथ्यांच्या आधारे निष्कर्ष योगतज्ञांसमोर मांडण्यात आले. अशी माहिती संस्थेच्या प्राचार्या प्रा.सुलभा गवळी व योग संशोधन विभागाच्या प्रमुख डॉ .मधुर गवळी यांनी सूत्रांना माहिती देताना सांगितले.
वरील संशोधनातील उल्लेखनीय बाब म्हणजे योगाचार्य श्री भास्करराव कुलकर्णी (होळीकर गुरुजी) यांनी निर्देशित केलेल्या महर्षी पतंजली यांच्या योग सूत्रावर आधारित ध्यान पद्धतीवर विशेष चर्चा होय.