राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर योग साधकांचे कार्य प्रसार हेतूने प्रेरित ” श्री आदियोग टाईम्स” या डिजीटल मासिकाचे आज योगदर्शन २०२४ परिषदेत प्रकाशन.
या डिजिटल मासिकाचे प्रकाशन योगदर्शन परिषदेचे औचित्य साधून यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे प्र-कुलगुरू मा. डॉ .संजीव सोनवणे यांचे शुभहस्ते आज होत आहे.
महाराष्ट्रातील विविध शहरातील योग संस्थांच्या द्वारे घडत असलेले योग कार्य ,योग संशोधन जगभर प्रसूत व्हावे यासाठी श्री आदियोग आंतरराष्ट्रीय संस्थेद्वारे या मासिकाची योजना केली आहे .त्यानिमित्ताने महाराष्ट्रातील योग साधक ,विद्यार्थी ,शिक्षक ,योग संशोधक ,योग विषयक लिखाण करणारे लेखक ,योग तज्ञ यांना आपले विचार मांडण्याचे माध्यम त्यामुळे निर्माण होणार आहे असे प्रतिपादन संस्थापक संपादक डॉ.संजय गवळी प्रा.सुलभा गवळी यांनी केले.
केंद्रीय संस्कृत महाविद्यालय दिल्ली येथील विद्यमान कुलगुरू मा.श्रीनिवास वरखेडी ,कविकुलगुरू कालिदास संस्कृत विशाविद्यालयाचे कुलगुरू मा .डॉ हरेराम त्रिपाठी ,मा कुलगुरू .डॉ मधुसूदनजी पेन्ना ,महर्षी पाणिनी वेदिक विद्यापीठाचे उज्जैनचे कुलगुरू डॉ विजयकुमार मेनन ,केंद्रीय जयपूर विद्यापीठाचे डॉ.आनंद भालेराव ,SVYASA बंगळूरू संस्थेचे मा.अधिष्ठाता व आंतरराष्ट्रीय स्तरावरील नामांकित I -JOY योग पत्रिकेचे संपादक डॉ टी. एम. श्रीनिवासन, योग शास्त्रज्ञ प्रा ए.आर पांडेय यांनी श्री आदियोग संस्था उभारणीस सतत दिलेल्या मार्गदर्शनाचे व उत्तेजनाचे या प्रसंगी विशेष स्मरण होते असे संचालक डॉ संजय गवळी यांनी या प्रसंगी नमूद केले .
योगभूमी नाशिक शहराने योग क्षेत्रामध्ये विविध परंपरेला वाहिलेले जवळजवळ १०,००० पेक्षा अधिक योग शिक्षक आजवर प्रशिक्षित केले आहेत.ते जगभर योग शिक्षण ,योग प्रसार ,योग प्रचार करण्याचे कार्य करीत आहेत .
देशभरात व आंतरराष्ट्रीय स्तरावर शहरातील नामांकित योग संस्थाद्वारे गेली ४० वर्षे सातत्याने योग शिक्षण घरोघरी पोचविण्याचे कार्य घडत आहे .विशेषतः नाशिक मध्ये उदयास आलेल्या योगाचार्य डॉ विश्वास मंडलिक यांनी स्थापन केलेले अग्रगण्य योग विद्या गुरुकुल ,श्री रामकृष्ण- स्वामी विवेकानंद भावधारेतून प्रेरित डॉ संजय गवळी व प्रा.सुलभा गवळी यांनी संचलित केलेल्या श्री आदियोग आंतरराष्ट्रीय शिक्षण व संशोधन संस्था ,प्रा .पिराजी नरवाडे संचालित निसर्गयोगी महाविद्यालय या सक्रीय योगदान देत आहेत .
महाराष्ट्रात इतर शहरांमध्ये योग प्रसारामध्ये लोणावळा येथील स्वामी कुवलयानंद यांनी स्थापन केलेले कैवल्यधाम ,डॉ एम. एम. घरोटे संचालित दी लोणावळा योग संस्था बारामतीमध्ये डॉ निलेश महाजन -डॉ. भक्ती महाजन संचालित प्राण योग महाविद्यालय .वाशी-नेरूळ मध्ये योगाचार्य पद्मश्री कै .सदाशिव निंबाळकर प्रेरित योग निकेतन संस्था ,हटयोगी कै .निकम गुरुजी प्रेरित अंबिका योग कुटीर, ठाणे येथील आदरणीय डॉ. श्रीकृष्ण व्यवहारे प्रेरित घंटाळी मंडळ , डॉ सुषमा काळे संचालित कोहम महाविद्यालय यांचा सहभाग उल्लेखनीय आहे .
या उपक्रमास सकाळचे मा. संपादक व स्वा. विवेकानंद केंद्राचे नाशिक विभागाचे संचालक .डॉ विश्वासजी देवकर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे . योगदर्शन २०२४ परिषदेचे संयोजक डॉ .जयदीप निकम ( संचालक स्वास्थ्य शास्त्र विभाग ) यांचे योग प्रसारासाठी असलेले उत्तेजन हे मासिकाच्या निर्मितीसाठी प्रेरणादायी ठरले आहे .
