भारतीय परंपरेत योगाला एक विशिष्ट स्थान आहे. योग चिंतनाबरोबरच त्याचा व्यवहारिक उपयोग हा देखील महत्त्वाचा आहे. त्यामुळेच जिज्ञासु साधक जगभरातून आज भारतीय योग परंपरेकडे आकर्षिले गेलेले आहेत. आजच्या युगात वैज्ञानिक परंपरा,त्यातील संगती, सुसंगती, समन्वय आणि आधुनिक वैज्ञानीकरण याचे संपूर्ण श्रेय हे स्वामी कुवलयानंदांना जाते. स्वामी कुवलयानंद हे स्वतः योग साधक असल्याने, त्यांचे सूक्ष्म अनुभव व त्यांनी स्वतः त्याचे महत्व जाणल्यामुळे आपला विषय प्रचार आणि प्रसार करण्याच्या हेतूने बाबतीत त्यावर मोठे कार्य उभे केले. सुखाची लालसा, चंगळवाद अशा युगात योगसाधनेकडे जगाचे लक्ष वेधणे हे दिव्य कार्य असताना संपूर्ण आयुष्य योग रूपी श्वास घेऊन ते जगले. योगातील वैज्ञानिक निष्कर्ष जगासमोर मांडले.
- शास्त्राची योग निवारण क्षमता –छोट्या ,मोठ्या ,सामान्य,दुर्धर किंवा असामान्य विकारांवर योग साधनेची उपयोगिता स्पष्ट झाली आहे .कोविड-19 च्या जागतिक महामारीच्या काळात कोणतेही उपाय उपलब्ध नसताना योगशास्त्र आशेचा किरण बनवून जगाच्या मदतीला सज्ज झाले हे आपणास विसरून चालणार नाही. अवघ्या मानवजातीस स्वास्थ्याच्या मार्गावर घेऊन जाण्याची क्षमता असणारा हा विषय आहे. दैनंदिन जीवनात योग साधना अंगिकारल्याने शारीरिक, मानसिक, सामाजिक, अध्यात्मिक स्तरावर लाभ होतो हा अनुभव नोंदविला गेला आहे . योगाचे प्रमुख लक्ष्य हे बरे करणे नसून तो होऊच नये यासाठी त्याचा अवलंब करणे हा आहे . मानव कल्याणासाठी उद्दिष्टे अभ्यासणे हा आहे. आत्मतत्त्वाचे निरूपण करून शांती, समाधान प्राप्ती करणे .क्लेशनिवारण करणे हे सहज सध्या आहे .त्यासाठी विविध साधनांचा मार्ग अभ्यासणे आवश्यक आहे. चित्ताच्या मनोव्यापारावर नियंत्रण स्थापित होऊन ,शरीर- इंद्रिय यांची संतुलन स्थिती प्राप्त करणे. क्लेश-अतृप्ती यावर विजय मिळविणे.मानवी जीवनात सुख-समाधान व शांती मिळवून देणे हे आधुनिक योगशास्त्राचे ध्येय आहे. (WHO)जागतिक आरोग्य संघटनेनुसार अनेक व्याधींचे ,रोगांचे निवारण कसे करावे यासाठी आव्हाने अधोरेखित केली गेली आहेत .परंतु ते सोडविण्याचे उपाय नाहीत .योगविद्येमध्ये चारही स्तरावरील आरोग्य टिकवण्याचे उपाय आहेत.
- शास्त्राची व्यावहारिक उपयोगिता – व्यक्तीचे दैनंदिन आरोग्य, विद्यार्थी जीवन, क्रीडा क्षेत्र,औद्यागिक क्षेत्र, कैद्यांचे पुनर्वसन, बाल गुन्हेगारी, माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रात योगाचा उपयोग सातत्याने व महत्त्वपूर्ण होत आहे.दुःख ,दौर्मनस्य ,अंगमेजयत्व ,श्वास- प्रश्वासातील बिघाड, नैराश्य- वैफल्य अशा अनेक छोट्या मोठ्या सामान्य विकारांवर योग व निसर्गोपचाराची उपयुक्तता सिद्ध होत आहे .समाजाला आज योग व निसर्गोपचाराचे महत्त्व पटल्याने एक अत्यावश्यक गरज म्हणून पुढे येत आहे. योग आणि निसर्गोपचार शास्त्रे असल्याने त्यांच्या मार्गदर्शनानुसार अंमलबजावणी केल्यास अनेक व्याधी मुळासकट नष्ट करण्याची क्षमता आढळून येत आहे .
- शास्त्राची स्वास्थ्य कल्याणासाठी शक्यता –लाभदायी निसर्गोपचार ही तत्व चिकित्सा आहे. निसर्ग हा महान वैद्य आहे. निसर्गोपचारात चिकित्सा हि रोगाची न करता शरीराची केली जाते .रोग्याच्या शरीराची चिकित्सा करून त्याला दोषमुक्त बनविले जाते. रोग म्हणजे शरीरात एकत्र झालेले विजातीय द्रव्य किंवा दूषित मल होय. उदाहरणार्थ विचार शास्त्रानुसार व्यक्तीचे डोके दुखत असेल तर औषध हि त्याची चिकित्सा नसून याचे मूळ पचन अथवा रक्तदोष याचा इलाज करून डोकेदुखी आपोआप नष्ट केली जाते निसर्गोपचारस म्हणतात अधिक जीवन जगणे त्यातील तुषार मालिश अन्नघटक याचा विचार होतो तत्वानुसार योग साधनेतील सर्व शुद्धी क्रिया,नौली ,धौती ,बस्ती, कपालभाती ,त्राटक,शंखप्रक्षालन,टब बाथ ,स्पायनल बाथ याद्वारे इलाज केला जातो.व्याधीनुसार विटामिन, प्राणायाम उपवास चिकित्सा केली जाते . रोगाची चिकित्सा करताना त्याला काही मर्यादा आहे. जन्मजात व्याधी, शल्य चिकित्सा अँटिबायोटिकचा वापर,अपघात, रक्तस्त्राव ,तातडीची उपचार यासाठी उपचार पद्धतीत मर्यादा आहे .योग आणि निसर्गोपचारास येणारा भविष्यकाळ हा अतिशय उज्वल व समृद्ध आहे.या उपचार पद्धतीस आधुनिक काळात तज्ञांनी परिश्रमपूर्वक या दोन्ही शास्त्रांचे महत्व जगाला पटवून दिले आहे .